रक्षाबंधन दिवशी मोदी सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट

 
Gas Subsidy
Gas Subsidy

मोदी सरकारची सर्वसामान्यांना भेट

रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंञीमंडाळाची बैठक पार पडली या बैठकीनंतर केंद्रीय मंञीमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाची माहीती केंद्रीय मंञी मा.अनूराग ठाकूर यांनी दिली याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की ७५ लाख महीलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत त्यांना गॅस पाईप आणी स्टोव्ह ही मोफत दिले जाणार आहे.

कीती मिळणार सबसिडी

तसेच गॅस सिलेंडर पून्हा एकदा स्वस्त झाले आहेत या आधी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यवसाईक सिलेंडरच्या कीमतीत शंभर रूपयांनी कपात केली होती.आता केंद्र सरकार घरगूती गॅस सिलेंडरवर २०० रूपयापर्यंत सबसिडी देणार आहे.
केंद्र सरकारने रक्षाबंधन आणी ओणम सणादिवशी मोठी घोषणा केली आहे. गॅस सिलेंडरच्या कीमतीमध्ये सर्व ग्राहकांना दोनशे रूपयापर्यंत सबसिडी दिली जाणार आहे त्यामूळे गॅस सिलेंडर तब्बल २०० रूपयांनी स्वस्त होणार आहे .महागाईने होरपळणाऱ्या जनतेला सरकारच्या या निर्णयामूळे मोठा दिलासा मिळणार आहे.

उज्वला योजनेच्या लाभार्थीनां कीती मिळणार सबसिडी

तर उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनां दोनशे रूपये अतिरिक्त अनूदान दिले जाणार आहे म्हणजेच त्यांना  गॅस सिलेंडरवर एकूण ४०० रूपये अनूदान दिले जाणार आहे.केंद्रीय मंञी अनूराग ठाकूर म्हणाले की उज्वला योजने अंतर्गत असलेल्या लोकांना गॅस सिलेंडरवर दोनशे रूपये वेगळे अनूदान दिले जाणार आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाखो सर्वसामान्य लोकांना फायदा होणार आहे.

Post a Comment

0 Comments